राष्ट्रीय तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्रिशा मयेकरची निवड

रत्नागिरी : तालुक्यातील गणराज तायक्वांडो क्लबची त्रिशा साक्षी सचिन मयेकर हिने नुकत्याच झालेल्या ज्युनियर तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत ४२ ते ४४ या वाजनी गटात उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतील यशामुळे तिची निवड १७ ते २० ऑगस्ट दरम्यान संभाजीनगर (औरंगाबाद) येथे होणाऱ्या अजिंक्यपद राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व बीड जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३४ वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा नुकत्याच बीड येथे झाल्या. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
या राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांडो क्लबची त्रिशा हिने ४२ ते ४४ या वाजनी गटात त्रिशा हिने अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. आता ती १७ ते २० ऑगस्ट दरम्यान संभाजीनगर (औरंगाबाद) येथे होणाऱ्या अजिंक्यपद राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत सहभागी होणार आहे.
त्रिशाचे आतापर्यंत ८ राष्ट्रीय स्पर्धेत पदक व सहभाग नोंदवला आहे. तिला प्रमुख महिला प्रशिक्षक सौ. आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्रिशा हिला राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, धुळेछंद मेश्राम खजिनदार व्यंकटेश करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांडो प्रशिक्षक राम के, मिलिंद भागवत, रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी, क्लबचे पदाधिकारी सौ. नेहा कीर, अभिजीत विलणकर, रंजना मोडूंळा, पूजा कवितके, कनिष्का शेरे, भगवान गुरव, साक्षी मयेकर व पालक यांनी त्रिशाला शुभेच्छा दिल्या आहेत.



