मुख्य बातमीशैक्षणिक

आपल्या कामाची भूमिका समजून घेऊन ती जबाबदारी पार पाडावी : जयंतप्रकाश गुरव

नवनिर्माण हायमध्ये 'इन्वेस्टीचर सेरेमानी' उत्साहात

रत्नागिरी : “आपल्या कामाच्या अधिकार कक्षांच्या बाहेर न जाता आपल्या कामाची भूमिका काय आहे हे समजून घेऊन ती जबाबदारी एका शिस्तीने पार पाडायची आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे,” असा मोलाचा सल्ला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जयंतप्रकाश गुरव यांनी दिला.

येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (सीबीएससी) आयोजित ‘इन्वेस्टीचर सेरेमानी’दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय पाटील, संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी वेगवेगळ्या हाऊसेसचे कॅप्टन म्हणून निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांकडे पदभार हस्तांतरित करण्यात आला.

बदल हा निसर्गाचा नियम असून, तो का गरजेचा उदाहरण देऊन सांगतानाच अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन नवनिर्माण हाय मुलांमधील सकारात्मक गुण विकसित करत असल्याबद्दल निरीक्षक श्री. गुरव यांनी शाळेचे कौतुक केले.

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री. पाटील यांनी कोणतेही पद ही खूप मोठी जबाबदारी घेऊन येते. नेतृत्वात एकाधिकारशाही न वापरता सगळ्यांना पुढे घेऊन जायचे असते, असे सांगितले. शिक्षक ही केवळ नोकरी नसून, ती सेवा आहे कारण त्यांच्या माध्यमातून संस्कारित, सुशिक्षित पिढी घडवली जात असते, असे नमूद करतानाच हा समारंभ पाहून समाधान वाटल्याचे सांगितले.

याप्रसंगी मुख्याध्यापक डॉ. पाटील, प्राचार्या डॉ. जगदाळे, संचालिका सौ. हेगशेट्ये यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी झाडाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

२०२४-२५ या वर्षासाठी कारभार पाहणारे विद्यार्थी असे : प्रेसिडेंट – विधी कापडी (दहावी), कमांडर – मुईज वागळे (नववी), व्हाइस कमांडर – भार्गवी पवार (आठवी), अंबर कॅप्टन अंजल कृष्णा (नववी), व्हाइस कॅप्टन – ओम गुरव (आठवी), एमराल्ड कॅप्टन – मृदुला गुरव (नववी), एमराल्ड व्हाइस कॅप्टन – अमेय खामकर (आठवी), रुबी कॅप्टन – मुक्ता सुर्वे (नववी), रुबी व्हाइस कॅप्टन – संस्कुती कोकरे (आठवी), सफायर कॅप्टन – सिद्धेश गायकवाड (नववी), सफायर व्हाइस कॅप्टन – आराध्य मनोरकर (आठवी), स्पोर्ट कॅप्टन – यासीन कुरेशी (नववी), स्पोर्ट सफायर व्हाइस कॅप्टन – खुशियाल गुप्ता (आठवी), डीसिप्लिन कॅप्टन – आलिया खतीब (नववी), कल्चरल कॅप्टन – गार्गी चव्हाण (नववी).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button