मुख्य बातमी

पावसामुळे गुहागरमध्ये ८८ हजारांचे नुकसान

गुहागर : सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. गेल्या दोन दिवसांत तालुक्यात ८८ हजार ७०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.

मौजे नरवण येथील विजया दत्तात्रय नाटूस्कर यांच्या गोठ्यावर झाड पडल्याने त्यांचे अंदाजे ७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मौजे निवोशी येथील योगिता एकनाथ दनदने यांच्या राहत्या घराचे अतिवृष्टीमुळे अंदाजे २ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे निवोशी येथील वसंत गोपाळ धुमक यांच्या याच्या राहत्या घरावर फणसाचे झाड पडून घराचे अंदाजे १४ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे

मौजे मारुती मंदिर येथील प्रमोद रामा भायनक यांच्या राहत्या घरावर नारळाचे झाड पडून घराचे अंदाजे २४ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे. निगुडंळ येथील वसंत राघो मुकनाक यांच्या गोठ्याचे छत कोसळून त्यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. साखरी त्रिशुळ गवळवाडी येथील गजानन दत्ताराम कासार यांच्या घरासमोरील संरक्षण भिंतीवर आंब्याचे झाड पडून संरक्षण भिंतीच्या कठड्याचे अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button