क्रीडामुख्य बातमी

रत्नागिरीच्या आकांक्षा कदमची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सुवर्ण कामगिरी  

रत्नागिरी : चेंबूर जिमखानाच्या वतीने आयोजित केलेल्या व उत्कष फायनास बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी महिला गटाचे विजेतेपद पटकावत रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिने सुवर्ण कामिगरी केली आहे. आकांक्षा कदम हिने अंतिम फेरीत मुंबईच्या रिंक्की कुमारीचा २५-१९ व २५-०५ अश्या सरळ दोन सेटमध्ये नमवले. उपांत्य फेरीत आकांक्षा कदम हिने मुंबईच्या नीलम घोडकेचे आव्हान तीन सेट मध्ये २२-११, १८-२५ व २५-०३ असे परतावून लावले. आकांक्षा कदम हिच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन करणात येत आहे.

आकांक्षा कदम हिला तिचे मामा व शिवछ‌‍त्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप देवरुखकर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आकांक्षा कदम हिने केलेल्या या सुवर्ण कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सल्लागार सुचयअण्णा रेडीज, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अधक्ष प्रदीप भाटकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे उपाधक्ष सुरेन्द्र देसाई, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे खजिनदार नितीन लिमये व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद साप्ते यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button