मुख्य बातमीशैक्षणिक

तन्वी तांडेलचे एमबीबीएसमध्ये यश

अलिबाग : पेण तालुक्यातील कासू- बुर्दी गावातील तन्वी वासुदेव तांडेल हिने खडतर परिस्थितीवर मात करत पहिल्या प्रयत्नात चांगल्या गुणांनी एमबीबीएस परीक्षेत पास झाली. तन्वी हिने तिचे पाच वर्षांचे वैद्यकीय शिक्षण किगीजस्तान (रशिया) येथून पूर्ण केले.

तन्वी तांडेल ही लहानपणापासून हुशार होती. तिने आपल्या बिकट परिस्थितीवर मात करून रशियासारख्या देशात शिक्षण घेऊन हे उज्ज्वल यश प्राप्त केले.

तन्वी तांडेल हिने मिळवलेल्या या यशाबद्दल आगरी साहित्य व संस्कृती सामाजिक विकास मंडळ अलिबाग, रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशन, प्रेस संपादक पत्रकार संघ रायगड, श्री समर्थ विचार फाऊंडेशन रायगड, रयत सामाजिक सस्था रायगड, प्रथा फाऊंडेशन अलिबाग यांच्या वतीने तिचा गौरव करण्यात आले आहे.

तांडेल कुटुंबियांमध्ये तन्वी ही पहिली एमबीबीएस डॉक्टर झाली असून, तिच्या या यशाबद्दल कुटुंबियांबरोबरच सर्व स्तरावरून तिचे कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button