नारदखेरकी येथे रत्नागिरी जिल्हा चिखल नांगरणी स्पर्धा उत्साहात

चिपळूण : तालुक्यातील नारदखेरकी गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे आयोजित केलेली रत्नागिरी जिल्हा भव्य चिखल नांगरणी स्पर्धा १८ जुलैला जल्लोषात पार पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेश लटके, चिपळूणचे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश घाग आणि मनसेचे चिपळूण जिल्हा परिषद कळंबट गटाचे उप तालुकाध्यक्ष संतोष हातिस्कर यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते. चिखल नांगरणी स्पर्धेत चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यांतून सुमारे ७४ नामांकित बैल जोड्या, शेतकरी मालक, नामांकित जॅकी आपले गावठी व घाटी बैल जोड्या घेऊन स्पर्धेत सहभागी झाले होते.
घाटी आणि गावठी अशा दोन गटांत झालेल्या स्पर्धेत एकूण १ लाख ७ हजारांची रोख रक्कम आणि मानाचे चषक मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन १४ विजेत्या बैलजोडी मालकांना व नांगरणी चालकांना गौरविण्यात आले. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय लोटला होता.
या स्पर्धेत घाटी गटातून पाली (रत्नागिरी) येथील संजय वामन सावंत यांच्या दोन्ही बैल जोडी यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. स्वराज्य स्वप्नील गुरव यांनी तिसऱ्या, अर्णव सचिन हरेकर (संगमेश्वर तूरळ) यांनी चौथ्या, संतोष सीताराम आलीम (शिंदे आंबेरे) यांनी पाचव्या, भैरी चंडिका (चिपळूण शिरवली) यांनी सहाव्या, स्वराज्य स्वप्नील गुरव (आरवली) यांनी सातव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
गावठी बैलजोडी गटातून विजेते म्हणून भैरी चंडिका (शिरवली) यांनी प्रथम, प्रकाश किळजे (मालघर) यांनी द्वितीय, सुरेश पर्शुराम सोलकर (वाडावे सराडे) यांनी तृतीय, गंगारामशेठ महाडिक (मालघर) चौथ्या, विग्नेश दिनेश हरेकर (संगमेश्वर तुरळ) पाचव्या, कृष्णा काशीराम शिंदे (शिंदे आंबेरे) सहाव्या, भैरी चंडिका राजू लाड (शिरवली) सातव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सर्व विजेत्या बैलजोडी मालकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धला प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे नेते अविनाश (दादा) जाधव, राज्य सरचिटणीस, वैभव खेडेकर, गुहागर विधानसभा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हा अध्यक्ष विनोद जाणवळकर, जिल्हा सचिव संतोष नलावडे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेश लटके, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, नारदखेरकी चिपळूणचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ डोळस, दापोलीचे भाजप तालुकाध्यक्ष केदार साठे, सरपंच राघो गणपत आंबवकर, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खेतले, मनसे चिपळूण तालुका सचिव संदेश साळवी, शेतकरी सेनेचे चिपळूण तालुकाध्यक्ष सुरेश घाग, खेडचे तालुकाध्यक्ष मंगेश चाळके, गुहागरचे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे, खेडचे शहराध्यक्ष ऋषीकेश कानाडे, दापोली शहराध्यक्ष साई पुसाळकर, गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, विनोद भोबस्कर,भाजपचे रत्नागिरी चिटनिस गणेश हळदे,भाजप गुहागर कोषाध्यक्ष सौरभ चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचे स्वीय सहाय्यक मोहन सावंत, मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, सहकार सेनेचे ता.अध्यक्ष विनोद चिपळूणकर, जि.प.कलंबट गटाचे उप तालुकाध्यक्ष संतोष हातिस्कर, जि. प. कलंबट चे विभाग अध्यक्ष रमेश वेलोंडे, वेळणेश्वर जि.प गटाचे नितीन कारकर, शेतकरी सेना उप ता.अध्यक्ष निकिल महाडिक, मनविसे (उत्तर) रत्नागिरीचे उपजिल्हा अध्यक्ष गुरुनाथ नागे, मनविसे चिपळूण तालुकाध्यक्ष सागर कदम, सोहम पाथरे, दापोलीतील श्री. पुसाळकर,ओमळी येथील ग्रा.पं. सदस्य सतीश कदम, स्पर्धेचे समालोचन करणारे मालघर येथील वैभव पवार, प्रदीप मोहिते, नारदखेरकी गावामधील आयोजक आणि नियोजन करणारे विलास दळवी, संदीप (पप्पू) हळदकर, माजी सरपंच पांडुरंग बांद्रे, रवींद्र दळवी, विजय झगडे (ग्रा. पं सदस्य), सुनील जाधव, प्रशांत मोहिते, सुधीर म्हस्के, रवींद्र खैर, रमेश गावडे, बेब्या हुमणे, अनिल सावंत, संतोष खांबे, दत्ताराम बांद्रे, अर्जुन बांद्रे, नारायण गांधी, चंद्रकांत जाधव, रघुनाथ चाळके, दीपक बांद्रे, दत्ताराम सावंत, जागा मालक प्रकाश झगडे, गोविंदशेठ बांद्रे, दाजीशेठ बांद्रे, मारुती बांद्रे (ग्रा.पं सदस्य), संजय बांद्रे, हरिचंद्र झगडे, रूपेश दळवी, प्रसाद हळदणकर, ओमळी येथील गावकर शंकर कदम, मनसे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, उपविभाग अध्यक्ष आणि मनसैनिक नानू हातीस्कर, सुजल मयेकर, सुमित जाधव, बाळा रसाळ, गोपीनाथ कदम, संदेश मयेकर, गावातील सर्व मनसैनिक, सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळी, महिला भगिनी आणि शेतकरी प्रेमी, व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



