मुख्य बातमीशैक्षणिक

कै.मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धा २३ व २४ ऑगस्टला रंगणार

रत्नागिरी : महाराष्ट्रातील मानाची, नामांकित आणि चार दशकांची दीर्घ परंपरा लाभलेली कै.मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २३ व २४ ऑगस्टला आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी १८ ऑगस्टपर्यंत नावे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कै.मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात दरवर्षी आयोजित केली जाते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला आहे. ज्वलंत, निर्भीड विषय, पारदर्शक निकाल आदी वैशिष्ट्यांनी स्पर्धा राज्यभरात नावलौकिकाला आली आहे.

या वर्षी ही स्पर्धा २३ आणि २४ ऑगस्ट या दोन दिवशी होत असून २३ ऑगस्टला माध्यमिक गटाची, तर २४ ऑगस्टला कनिष्ठ महाविद्यालयीन गटाची स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेचे विषय याप्रमाणे : 

राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गट

१)परिवर्तनाची नांदी, निर्भय बनो, २) आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, ३) पेपर फुटी आणि हतबल विद्यार्थी, ४) आरक्षण – एक सामाजिक आक्रोश.

जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गट

१) लाडकी बहीण आणि असुरक्षित महिला, २) समाज उद्धारक अहिल्यादेवी होळकर, ३) नवीन अभ्यासक्रम विवेकवादाला मारक!, ४) अल्पवयीन बेधुंदता आणि कायदे

जिल्हास्तरीय माध्यमिक गट

१) संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल, २)श्यामची आई समजून घेताना.., ३) माझ्या संकल्पनेतील आनंददायी शिक्षण, ४) पाणी हेच जीवन

माध्यमिक गट इंग्रजी (इंग्रजी)

1) The Journey of Indian Constitution Towards Platinum Jubilee, 2) Perceiving ‘Shyamchi Aai, a masterpiece of Value education, 3) Learn with Fun- My Perspective 4) Water Itself Is Life.

या स्पर्धेसाठी अधिक माहितीसाठी ९४२३१८९७६१, ९४२०८४२७९९, ७७९८३८२९७०, ९४०३२५७५८१ या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. आशा जगदाळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button