मुख्य बातमी

घोडवली, चांदिवणे गावात ग्रामस्थांमार्फत वृक्षारोपण

संगमेश्वर : तालुक्यातील घोडवली फाटा ते चांदिवणे चव्हाटा या भागातील रस्त्याच्या दुतर्फा दाट सावली आणि फळ देणारी झाडे लावण्यासाठी ग्रामस्थांनीच ग्रामस्थांना आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन ग्रामस्थांनी येथे नुकतीच वृक्ष लागवड पूर्ण केली.
ग्रामदेवता मंदिर येथून प्रथेप्रमाणे देवाची पूजा आणि श्रीफळ अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते कडुनिंबाची झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चांदिवणे चव्हाटा येथे जबाबदार व्यक्तींच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून चव्हाटा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी मिळून पहिल्या दिवशी घोडवली मेस्त्री यांचे घर ते गुरववाडी या दरम्याने वृक्षारोपण पूर्ण केले. उर्वरित भागातील वृक्षारोपण त्यानंतर प्रत्यक्ष मजुरांकडून पूर्ण करून घेण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सरपंच सौ. वैदेही बने, उपसरपंच सौ. भाग्यश्री बदड, पोलीस पाटील सौ अस्मिता बने, कृषी पर्यवेक्षक श्री. सुस्तरफोड, जिल्हा परिषद शाळा घोडवलीचे मुख्याध्यापक श्री. जोशी, ग्रामपंचायत सदस्य विजय मेस्त्री, तुकाराम रहाटे, माजी सरपंच संजय घडशी, गावचे प्रथम मानकरी किशोर बने आदी मान्यवर उपस्थित होते. सीताराम दळवी, विद्याधर बने आणि दीपक बने हे खास मुंबईहून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. ज्येष्ठ नागरिक दत्ताराम बने, दशरथ बने, रावजी गुरव, विलास बने, संतोष बने, रणजीत बने, अजित बने, किशोर बने, संदीप बने, राजेश दळवी, गणपत घडशी, सुचिंद्र बडद, वैभव घडशी, कृष्णा घडशी, एकनाथ काजरेकर, परशुराम शिंदे, चांदीवणे गावातील ग्रामस्थ अमृत चव्हाण, दत्ताराम शिंदे, दीपक कुळे, रामचंद्र शिंदे आदींनी प्रत्यक्ष वृक्षारोपणात सहभाग घेतला.
या उपक्रमासाठी ज्या ग्रामस्थांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली आहे त्यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. उपक्रम वर्षभर सुरू राहणार आहे. लावलेल्या झाडांची साफसफाई करणे, त्यांना आधारासाठी काठी लावणे, गुरे व अन्य वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी तजवीज करणे, उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करणे हे सर्व अपेक्षित आहे. यासाठी आणखी निधीची गरज भासणार असून, घोडवली आणि चांदिवणे दोन्ही गावातील इच्छुक ग्रामस्थांनी सढळ हस्ते आर्थिक मदत करावी आणि या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button