मुख्य बातमीशैक्षणिक

ग्रामीण भागातील तरुणाची जिद्द; लांजातील ओंकार माने यांचे सीए परीक्षेत सुयश

रत्नागिरी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) सीए इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाइन जाहीर झाला. या निकालात रत्नागिरी जिल्ह्यातील ओंकार रेश्मा गोपीनाथ माने यांनी सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षेत सुयश मिळवले आहे.

कुरचुंब या गावातील ओंकार रेश्मा गोपीनाथ माने हे नुकत्याच झालेल्या सीए परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. ओंकार माने यांचा शैक्षणिक प्रवास खडतर आहे. ते कुरचुंबच्या प्राथमिक शाळेतून शिकले. तिथून त्यांनी माध्यमिकचे शिक्षण जगन्नाथ पेडणेकर हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल व तु. पु. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालतून उच्च माध्यमिकचे शिक्षण घेतले. शाळेत अतिशय हुशार असलेल्या ओंकार माने यांना शिक्षकांचे सीए होण्यासाठीचे मार्गदर्शन मिळाले होते. माने हे पुढील शिक्षणासाठी मुंबईला रवाना झाले.

दरम्यान मुंबईला पदवीधरचे शिक्षण घेत असताना गुरुजी फाउंडेशनशी संपर्क झाला. सीए परीक्षेच्या तयारीसाठी लागणारा खर्च हा फॉउंडेशनने घेतल्याने त्यांनी पदवीधर शिक्षणाबरोबरच सीए परीक्षेची तयारी देखील सुरू केली. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा इंग्लिशमधून असलेल्या परीक्षेत टिकणे कठीणच; मात्र तरीही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तसेच संघर्षातून कष्ट घेऊन सीए होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

ओंकार माने यांचे आजच्या तरुणांच्या समोर एक उत्तम उदाहरण आहे. परिस्थिशी दोन हात करता आले तर नक्कीच यश संपादन करता येते हे ओंकार रेश्मा गोपीनाथ माने यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

या सगळ्या यशामागे ग्रामीण भागापासून मुंबईपर्यंत सर्व शिक्षकांच मार्गदर्शन तसेच गुरुजी फॉउंडेशनचे मोलाचे योगदान आणि कुटुंब व मित्रपरिवार यामुळे हे शक्य झाले असे ओंकार माने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button