मुख्य बातमी
पाचेरी सडामध्ये डोंगर खचला : ११ घरांना दरडीचा धोका
स्थलांतरीत होण्याच्या प्रशासनाकडून नोटीसा

गुहागर : तालुक्यातील पाचेरी सडा बौद्ध वाडी येथे डोंगर खचल्याने दरड रस्त्यावर आली. रस्त्याच्या खालच्या बाजूला ४२ कुटुंबांची लोकवस्ती असून, संभाव्य धोका लक्षात घेता यातील रस्त्यालगत असणाऱ्या ११ घरांना प्रशासनाकडून स्थलांतरीत होण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत.
सद्यस्थितीत ११ पैकी ९ कुटुंबे मुंबईत असून, उर्वरित ३ कुटुंबांना येथीलच विहारामध्ये स्थलांतरीत केले आहे. गुहागरचे तहसीलदार परिक्षीत पाटील, बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच पाणी विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्यावर आलेली माती जेसीबीच्या साह्याने बाजूला करून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या.



