मुख्य बातमीशैक्षणिक
चॉकलेट मेकिंग स्पर्धेत आरजू पटेल हीची कोकोनट बाईट रेसिपी प्रथम

संगमेश्वर : नवनिर्माण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट संगमेश्वर येथे जागतिक चॉकलेट दिनानिमित्त चॉकलेट मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. यात आरजू पटेल हिने बनवलेल्या ‘कोकोनट बाईट’ या रेसिपीला प्रथम क्रमांक मिळाला.
द्वितीय क्रमांक इक्रा पटेल हिच्या ‘चा चा चॉकलेट’ आणि सुयोग जोगळे याच्या ‘चोको क्रीम’ यांना विभागून देण्यात आला. तसेच तिसरा क्रमांक भक्ती राऊत हिच्या ‘चॉकलेट कोकोनट बर्फि’ने पटकावला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. पूजा प्रसादे यांनी केले.
या स्पर्धेसाठी प्राचार्या डॉ. संजना चव्हाण, विभाग प्रमुख भिकाजीराव बेहरे आणि किचन प्रमुख मितेश पवार यांनी मार्गदर्शन केले.



