Uncategorized

वाटुळ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला खास बाब म्हणून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची मंजुरी

पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या प्रयत्नांना यश

राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभरणीबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समृध्द योजनेचे संचालक किरण उर्फ भय्या सामंत यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. वाटूळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी मान्यता दिली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील वाटुळ या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी मागणी गेली अनेक वर्षांपासून संपूर्ण तालुकावासियांची होत होती. आता या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णालय उभारणीला खास बाब म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका वासियांचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सतत होणारे अपघात आणि आरोग्य सुविधा या अनुषंगाने वाटूळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात यावे अशी मागणी होत होती. या अनुषंगाने किरण सामंत यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू केला होता. उदय सामंत आणि किरण सामंत हे मागील काही महिन्यांपासून आरोग्य विभागाशी पाठपुरावा करत होते. आता या हॉस्पिटल उभारणीसाठी आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी खास बाब म्हणून मान्यता दिली आहे.

उद्योग मंत्री ना. उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने या हॉस्पिटलला मान्यता मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button