जागतिक चॉकलेट दिनानिमित्त एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात चॉकलेट स्पर्धा
हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे आयोजन

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे जागतिक चॉकलेट दिनानिमित्त चॉकलेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये तृतीय वर्षाच्या २० स्पर्धकांनी सहभागी होत चॉकलेटपासून नाविन्यपूर्ण पदार्थ बनवले. स्पर्धकांनी ७ जुलै रोजी सकाळी १०.३० ते १२ यावेळेत हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या किचन रूममध्ये आपले नाविन्यपूर्ण पदार्थ तयार करून त्यांची आकर्षक मांडणी दुपारी १२.०० ते १ या वेळेत केली. यावेळी विद्यार्थ्यांनी चॉकलेटपासून तयार केलेल्या पदार्थांमध्ये ‘चॉकलेट कोकोनट क्रॅक बार’, ‘चॉकलेट कॅलिफोर्निया रोल’, ‘बॉन बॉन मँगो चॉकलेट’, ‘चोको पॉट’, ‘चॉकलेट अलमंड पेसलिन गातो’, ‘पान चॉकलेट’, ‘चॉकलेट टाकोज’, ‘ओट्स चॉकलेट पॅनकेक’, ‘चॉकलेट ब्राउनी’ अशा विविध पदार्थांचा समावेश होता.
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये आणि एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. यात समर्थ बिर्जे आणि शिवम शिरोडकर यांनी तयार केलेल्या ‘बॉन बॉन मँगो चॉकलेट’ या पदार्थाला प्रथम क्रमांक मिळाला. अथर्व फडणीस आणि स्वाती सावंत यांनी तयार केलेल्या ‘कलिफोर्निया रोल’ या पदार्थाला द्वितीय क्रमांक, तर दक्षता राईन आणि सानिया संगमेश्वरी यांनी तयार केलेल्या ‘चॉकलेट कोकोनट क्रॅक बार’ला तृतीय क्रमांक मिळाला.
यावेळी परीक्षकांनी पदार्थांचे परीक्षण करतानाच स्पर्धकांना मार्गदर्शनही केले. परीक्षकांच्या हस्ते प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. ताराचंद ढोबळे, शेफ मेघना शेलार, अथर्व खांडेकर, सौ. सोनाली साठे यांनी मेहनत घेतली.



