मुख्य बातमी

अति मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यात ३ लाखांचे नुकसान

अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले

गुहागर : मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात ३ लाख ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेकांच्या घरांवर झाडे कोसळली असून कंपाऊंड वॉल, गोठे यांच्या नुकसानीचा समावेश आहे. दुकानांमध्ये आणि घरांमध्येदेखील पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

पावसाने काल (८ जुलै) सकाळपासून हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी रस्त्यावरती दोन फुटांपर्यंत पाणी साठले होते. गुहागर तालुक्यातील आरे- बाग पुलावरून पाणी जात असल्यामुळे तेथील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. तसेच शृंगारतळी बाजारपेठेमध्ये पावसाचे पाणी व गटारचे पाणी दुकानांमध्ये आणि घरांमध्ये शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वेलदुर, नवानगर, धोपावे या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचेही नुकसान झाले असून तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

गुहागर तालुका

८जुलै २०२४ रोजीचा पाऊस

गुहागर : १३० मिमी

पाटपन्हाळे : ८३ मिमी

हेदवी : ११५ मिमी

आबलोली : १६८ मिमी

तळवली : ११९ मिमी

एकूण पाऊस : ६१५ मिमी

आजचा सरासरी पाऊस : १२३ मिमी

आजपर्यंत एकूण सरासरी : ११६६ + १२३ = १२८९ मिमी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button