मुख्य बातमी

इंडियन स्टुडंट कौन्सिलचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

कौन्सिल अध्यक्ष डॉ. ज्ञानोबा कदम यांनी केली घोषणा

चिपळूण : इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या वतीने दिले जाणारे विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार इंडियन स्टुडंट कौन्सिल अध्यक्ष डॉ. ज्ञानोबा कदम यांनी सामाजिक न्याय दिनानिमित्त घोषित केले. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपूरे, पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, राजकीय क्षेत्रातील व समाजकारणातील योगदानासाठी आमदार बच्चू कडू, सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. महेश देशमुख, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. महेश पाटील, संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. बळीराम गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे.

माहिती व तंत्रज्ञान युगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार दिला जातो. इंडियन स्टुडन्ट कौन्सिल ही ‘शिक्षणाच्या हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन देशातील पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यात कार्यरत असून महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतही कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांवर तसेच शिक्षक व प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांवर ही संघटना सक्रियपणे काम करते.

या संघटनेच्या वतीने आतापर्यंत अभिनेता हर्षद शिंदे, पत्रकार प्रज्ञा पोवळे, अभिनेता संजय खापरे, ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक, अभिजीत हेगशेट्टे यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०२३-२४ या वर्षाचा विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार इंडियन स्टुडंट कौन्सिल अध्यक्ष डॉ. कदम यांनी घोषित केले. यावेळी प्रा. डॉ. धनाजी थोरे, प्रा. माधुरी राऊत, प्रा. डॉ. सीमा शेट्ये, प्रा. डॉ. दीपाली भावे, प्रा. डॉ. रेखा बडोदेकर, प्रा. डॉ. प्रज्ञा लोखंडे, प्रा. मयूरी कुंभार, प्रा. डॉ. आरती गायकवाड, प्रा. संयोगीता सासणे, प्रा. डॉ. प्रज्ञा कमडी, प्रा. वैशाली दामले, सारिका शिंदे, सुवर्णा शिंदे, मनोज हिवाळे, पोर्णिमा बनसोड, कमल येउल, प्रा. कविता कटारे, प्रा. डॉ. वैशाली बेटकर, कु. सारा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button