मुख्य बातमी

कृषी दिनानिमित्त १ जुलैला प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार

ग्रामपंचायत करबुडे येथे आयोजन

रत्नागिरी : जिल्हा परिषद कृषी विभाग, पंचायत समिती रत्नागिरी आणि राज्य शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै रोजी ग्रामपंचायत करबुडे येथे कृषी दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार समारंभ, वृक्ष वाटप, वृक्ष लागवड, चारसूत्री भात लावणी प्रात्याक्षिक होणार असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी दिली.
करबुडे ग्रामपंचायतीत सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शन, प्रगतशील शेतकरी सत्कार समारंभ, निवड झालेल्या सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांचे अभिनंदन, वृक्ष वाटप व वृक्ष लागवड तसेच चारसुत्री भात लावणी प्रात्याक्षिक आदी कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमास ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कृषी विकास अधिकारी श्री. शेंडे, सरपंच संस्कृती पाचकुडे आणि गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button