मुख्य बातमी

‘आरजू’ गुंतवणूकदारांच्या न्याय हक्कासाठी मनसे मैदानात

रत्नागिरी : येथील आरजू टेकसोलमध्ये सुमारे ४० कोटींहून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आज मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी एम देवेंदरकुमार यांची भेट घेऊन संयुक्त निवेदन देवून या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘आरजू’च्या गुंतवणूकदारांना पोलीस अधिक्षकांकडून यासंबंधीचा अहवाल मागून यात जातीने लक्ष घालून संबंधित गुन्हेगारांना लवकरात लवकर गजाआड करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
याप्रसंगी मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्यासह तालुका सचिव अॅड. अभिलाष पिलणकर, विभाग अध्यक्ष सोम पिलणकर, विवेक साठे, मुकुंद शेवडे, सौ. स्वाती दामले, मनाली ढवळे आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button