संगमेश्वर नवनिर्माण महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा
डॉ. अश्विनी नारकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

संगमेश्वर : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. अश्विनी नारकर यांनी विद्यार्थ्यांना योगाविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रज्ञा कदम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. अश्विनी नारकर यांनी यावेळी प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रकार आणि त्याचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी शरीराने आणि मनाने कसे स्वस्थ राहता येईल याविषयी योगासनांच्या माध्यमातून माहिती दिली.
आजच्या आधुनिक काळातील तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगाचे फार महत्त्व आहे, असे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी बोलताना संगितले.
योग ही साधना असून, ती प्राप्त करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असे, आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य संजना चव्हाण म्हणाल्या. उपस्थित मान्यवरांचे रोपटे देऊन देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष खरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल नेमण यांनी केले. प्रा. प्रशांत जाधव यांनी आभार मानले.



