मुख्य बातमी

कोकण रेल्वे मार्गावर २२ जूनला धावणार मुंबई ते सावंतवाडी स्पेशल गाडी 

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या विशेष समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर गाडी क्रमांक ०११७१/०११७२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी ही १८ डब्ब्यांची विशेष गाडी शनिवारी (२२ जून) धावणार आहे.

गाडी क्र. ०११७१ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड स्पेशल मुंबई सीएसएमटी येथून २२ जूनला (२१ जूनला मध्यरात्री) रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल. गाडी त्याच दिवशी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडी रोडला पोहोचेल. गाडी क्र. ०११७२ सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी स्पेशल सावंतवाडी रोडवरून २२ जूनला रोजी ३ वाजून १० मिनिटांनी सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी ४ वाजून ३५ मिनिटांनी मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल. या गाडीला एकूण १८ कोचची असेल. यात फर्स्ट एसी – ०१ कोच, कंपोझिट (फर्स्ट एसी + २ टियर एसी) – ०१ कोच, २ टायर एसी – ०२ कोच, ३ टायर एसी – ०६ डबे, जनरल – ०६, एसएलआर – ०२ यांचा समावेश असेल.

प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button