पोलीस भरती प्रक्रियेच्या ठिकाणी सर्व वाहनांना बंदी
पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन

*रत्नागिरी :* पोलीस भरती प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाहनांना पोलीस अधीक्षक कॉर्नर साई चौक ५०० मीटर अंतरामध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस भरती २०२२-२३ची भरती प्रक्रिया १९ जून २०२४ पासून सुरू झाली आहे. पोलीस भरती प्रक्रियादरम्याने भरती प्रक्रिया परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून, यावेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतो अगर वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी यांनी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १९ जूनपासून ते संपूर्ण भरती प्रक्रिया संपेपर्यंत रोज सकाळी ६ वाजल्यापासून ते त्याच दिवशीची भरती प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाहनांना जेल नाका पुढील पोलीस अधीक्षक कॉर्नर ते मुख्यालय पुढील गवळीवाड्याकडे जाणारा रोड साई चौक असे ५०० मीटर अंतरामध्ये प्रवेश बंद करण्याबाबत आदेशित केले आहे.
तसेच पर्यायी मार्ग म्हणून जेल नाका ते पोलीस अधीक्षक कॉर्नर मच्छीमार्केट रोड, तसेच धनजी नाका-गवळीवाडा रोड- टीसीएम हायस्कूल ते माळनाका या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी आदेशित केले आहे.



