‘नवनिर्माण’मध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी गर्दी

रत्नागिरी : येथील एस. एम. जोशी विद्यानिकेतनमधील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी, बारावीसाठी तर एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालयात बीए, बीकॉम, एस्सी, बीएस्सी (सीएस), बीएस्सी (आयटी), बीएमएस, बीबीआय, हॉस्पिटॅलिटी स्टडीज या पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी प्रवेशासाठी गर्दी करत आहेत.
नुकताच दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल लागला असून पुढील शिक्षणासाठी वेगवेगळे पर्याय शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना नवनिर्माण महाविद्यालय आणि एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय उत्तम पर्याय असून, हे कोकण विभागातील नामांकित महाविद्यालय आहे. मुंबई विद्यापीठाशी संबंधित असलेल्या एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालयाला नुकतीच ‘नॅक’ची ‘ब’ श्रेणी प्राप्त झाली आहे. संस्थेच्या एस. एम. जोशी विद्यानिकेतनमध्ये मुलांना शिक्षणासाठी विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असून, यामध्ये कॉम्प्युटर सायन्स, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट यांसारखे अभ्यासक्रमही येथे उपलब्ध आहेत. मुलींसाठी ५ हजार रुपयांची मलाला स्कॉलरशिप येथे दिली जाते.
महाविद्यालयास ‘नॅक’ची ‘बी’ श्रेणी प्राप्त, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने कार्यक्रम राबविणे, क्रीडा व सांस्कृतिकमध्ये विद्यापीठ राज्य व राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांचा सहभाग व प्रावीण्य, उत्कृष्ट निकालाची परंपरा, कार्यशाळा परिसंवाद व चर्चासत्रांचे सातत्याने आयोजन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विविध विषयांचे सर्टिफिकेट कोर्स, स्मार्ट क्लास व आयसीटी रूम्स, शिष्यवृत्तीची सुविधा, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, प्रशस्त सेमिनार हॉल, जिम तसेच ओपन ग्राउंड आणि इनडोअर ग्राउंडची सुविधा आणि प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष सुविधा ही या महाविद्यालयाची वैशिष्ठ्ये आहेत.
कला शाखेची वैशिष्ठे : मोफत कौशल्य आधारित सर्टिफिकेट कोर्स, इंग्रजी, मराठी हिंदी हे भाषा विषय तसेच भूगोल, अर्थशास्त्र, इतिहास यातील विषय निवडल्यानंतर पत्रकार, संवाद लेखक, शिक्षक, सरकारी नोकर, सर्व्हेअर, GIS सॉफ्टवेअर, पर्यटन व्यवसाय, मार्केटिंग, जाहिरात या क्षेत्रात काम करण्याची संधी.
बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज) अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये : १०० टक्के नोकरीची हमी, एससी/एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दर्जेदार व अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज मुलभूत किचन प्रशिक्षण लॅब, सुसज्ज कॉम्पुटर लॅब, ऍडव्हान्स ट्रेनिंग रेस्टॉरंट, हाऊसकिपिंग ट्रेनिंग डेमो रूम आणि पॅन्ट्री, प्रशस्त फ्रंट ऑफिस, विद्यार्थी कौशल्य विकासावर भर, पंचतारांकित हॉटेलला भेट आणि प्रशिक्षण.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरचे फायदे : पंचतारांकित हॉटेल मध्ये नोकरी करण्याची संधी, परदेशी नोकरी करण्याची संधी, स्वतःसाठी व इतरांसाठी रोजगार निर्मितीची संधी, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करियर करण्याची संधी, रेल्वे , आर्मी , नेव्ही, ऐअरफोर्स, शिपमध्ये तसेच इतर उच्च पदस्थ नोकरीची संधी, स्पर्धात्मक परिक्षा देता येतात.
बीकॉम अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये : मुंबई विद्यापीठाशी सलग्नीत वाणिज्य, बीएमएस, बँकिंग इन्शुरेंस पदवी अभ्यासक्रम, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, प्रथम वर्षाच्या मुलींसाठी संस्थेतर्फे मलाला स्कॉलरशिप, एससी/एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनाची शिष्यवृत्ती योजना, अर्धवेळ नोकरीच्या संधी, प्लेसमेंट कॅम्पस – बँक आणि इतर उद्योगांमध्ये, इतर मोफत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रधानमंत्री कौशल विकास योजना शासन प्रमाणपत्र मोफत अभ्यासक्रम, सुसज्ज आयटी लॅब, वाणिज्य, BMS आणि BBI विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेट, ऑनलाइन डिजिटल शिक्षण सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे ग्रंथालय, २५ वर्षांची रौप्य महोत्सवी ऑफर.
बीएस्सी (सीएस) आणि बीएस्सी (आयटी) अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये : बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स आणि बीएस्सी इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रमासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, प्रथम वर्षाच्या मुलींसाठी संस्थेतर्फे मलाला स्कॉलरशिप, एससी/एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनाची शिष्यवृत्ती योजना, अर्धवेळ नोकरीच्या संधी, इंडस्ट्रियल व्हिजिट, सुसज्ज लॅब, सर्टिफिकेट कोर्स आणि इंटर्नशिप, वर्कशॉप, सेमिनार, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत कोर्सेस, १५००० पेक्षा अधिक पुस्तके असलेले सुसज्ज ग्रंथालय, इंटरनेट व वायफाय सुविधा असलेला कॉलेज कॅम्पस, क्रीडागुणांना वाव देण्यासाठी प्रशिक्षण व क्रीडांगण, सांस्कृतिक उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन.
प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाविद्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेशासाठी संपर्क : ९४२०८४ २७९९, ९४२३१८ ९७६१, ८८०६८४४५६९
पदवी अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क :
कला शाखा (बीए) – ७५८८८६१५२५, ९९२१४३५३४३, ८७६६८६३४९८
बीकॉम, बीएमएस, बीबीआय – ७२४९२४०७०२, ९२७२००५४००
बीएस्सी, बीएस्सी (आयटी), बीएस्सी (सीएस) – ९८३४६५६५६८, ९७६६०६६ ६१३, ८३८००५४१२९
बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज) – शेफ मेघना ९८६०३०१२५८, विभाग प्रमुख ७७१९८५१०२५



