मुख्य बातमी

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, प्रा. डॉ. पूजा मोहिते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील साळवी, प्रा. सायली कांबळे यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी प्रा. साळवी यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वृक्षलागवड महत्त्वाची असल्याचे सांगितले. केवळ वृक्ष लागवड न करता लावलेल्या वृक्षाची सुरुवातीच्या काळात योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
“नुकताच आपण असह्य उन्हाळा अनुभवला. त्यामुळे आपल्या आजुबाजूला झाडे असणे, आजूबाजूचा परिसर हिरवागार असणे किती गरजेचे आहे, हे समजले. म्हणूनच आपल्याला जमतील तशी झाडांची लागवड केली पाहिजे आणि त्यांची काळजीही घेतली पाहिजे,” असे प्रा. डॉ. मोहिते यांनी सांगितले. या वेळी महाविद्यालय परिसरात १० वडाच्या झाडांचे रोपण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button