मुख्य बातमीसाहित्य-कला

सुनील बेंडखळे यांना उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने रंगभूमीवरील योगदानासाठी उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकप्रिय लोकनाट्याचे सूत्रधार आणि मुख्य कलावंत तात्या गावकर ऊर्फ सुनील बेंडखळे यांना जाहीर झाला आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी विविध पुरस्कारांनी मान्यवरांना सन्मानित केले जाते.येत्या १४ जूनला माटुंगा-मुंबई येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
कै. शाहीर साबळे, कै. सुधीर भट, कै. स्मिता तळवळकर आणि कै. आनंद अभ्यंकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्य परिषदेतर्फे हा पुरस्कार श्री. बेंडखळे देण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले याबाबतचे पत्र त्यांना दिले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी व अशोक सराफ (जीवन गौरव) यांच्यासह अनेक कलाकारांनाही यावेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री. बेंडखळे यांनी ‘कोकणचा साज..’ लोकनाट्याचे आतापर्यंत साडेचारशे प्रयोग सादर केले आहेत. कोकणातील विविध लोककलांचे विनोदी शैलीत सादरीकरण करून रसिकांचे मनोरंजन ते करत आहेत. याशिवाय विविध नाटक, एकांकिका, शॉट फिल्म, वेबसिरीज व चित्रपटांमधूनही भूमिका साकारल्या आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल उत्कृष्ट लोककलावंत पुरस्काराने त्यांना सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कारबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button