महाविकास आघाडीची पाचल गटात प्रचार सभा

राजापूर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक भाऊराव राऊत यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटाची प्रचार सभा आज (३० एप्रिल) तळवडे येथील प्रभावती हॉलमध्ये शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
या सभेत सर्वांनी एकमुखानी महा आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना प्रचंड बहुमत देण्याचे निर्धार करण्यात आला. या प्रसंगी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष अविनाश लाड, उपनेते लक्ष्मण वडले, पुणे उपशहर संघटक विद्या ताई होडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पांडुरंग उपळकर, वसीम देशमुख मराठवाडा, माजी आमदार गणपत कदम, क्षेत्रप्रमुख जया शेठ माने, रत्नागिरी दक्षिण जिल्हा संघटक रवींद्र डोळस, महिला उप जिल्हा संघटक दुर्वा तावडे, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, कॉंग्रेस किशोर नारकर, राष्ट्रवादी आबा आडीवरेकर, काँग्रेस तालुका संघटक जितेंद्र कदम, दत्ता कदम, माजी उप जिल्हाप्रमुख अशोक सेक्रे, महिला तालुका संघटक प्राची शिर्के, युवासेना कॉलेज कक्ष महाराष्ट्र अथर्व साळवी, रत्नागिरी दक्षिण युवाधिकारी दुर्गेश साळवी, उप तालुकाप्रमुख विश्वानाथ लाड,।विभागप्रमुख गणेश तावडे, तालुका संघटक नंदू पाटकर, युवासेना विभाग अधिकारी संदीप बारस्कर, उमेश पराडकर, उप विभागप्रमुख नीतेश सावंत, प्रदीप चांदूरकर, अफझल पाटणकर, अण्णा बेर्डे, काँग्रेस विनायक सेक्रे, विलास नारकर, सुरेश ऐणारकर, शिवाजी रबसे, आत्माराम सुतार, अंजली कडू, हर्षद तेलंग, मयूर रेडीज, मंगेश पांचाळ, माधवी पांचाळ व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), आप, सर्व उप तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उप विभागप्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शाखाप्रमुख, सरपंच, उप सरपंच, सदस्य ग्रामपंचायत, बुथप्रमुख, गटप्रमुख, उप शाखाप्रमुख मुंबई व ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



