मुख्य बातमी
जप्त रक्कमेच्या परतीसाठी सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत जिल्ह्यातील भरारी पथके, स्थिर तपासणी पथके यांनी जप्त केलेली रोख रक्कम परत करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीकडे नोडल अधिकारी खर्च सनियंत्रण समिती आणि जिल्हा कोषागार अधिकारी यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या कालावधीत तपासणी पथकांकडून जप्त केलेल्या जप्तीविरुध्द संबंधितांना या समितीकडे अपिल करता येईल. समिती अशा सर्व प्रकरणांबाबत निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व पुराव्यांची तपासणी करून, ही रक्कम संबंधितांना परत देण्याची कार्यवाही करेल. याबाबत अपिल करण्यासाठी नागरिकांनी, नोडल अधिकारी खर्च सनियंत्रण समिती उत्तम सुर्वे यांच्याशी (७५८८५८८९५०) संपर्क कराण्याचे आवाहन केले आहे.



