भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उद्या रत्नागिरीत
रत्नागिरीतील प्रतिष्ठीत व्यक्तींशी संवाद साधणार

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे २४ एप्रिल रोजी रत्नागिरीत येणार आहेत.
महायुतीकडून प्रचाराला सुरुवात झाली असून, शहरातील काही प्रभागांमध्ये मतदारांशी संवाद साधला जात आहे. भाजपमधील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते श्री. राणे यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर आता श्री. राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे रत्नागिरीत येणार असून, यावेळी ते रत्नागिरीतील मान्यवर, प्रतिष्ठीत व्यक्तींशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात होणार आहे.
कार्यक्रमाविषयी :
दिवस : बुधवार, २४ एप्रिल २०२४
वेळ : सकाळी ९.०० वाजता
स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी.



