मुख्य बातमी

संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या सरपंचपदी डॉ. श्रीराम केळकर

रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंचकमिटीच्या नव्या सरपंचपदी मालगुंड येथील डॉ. श्रीराम विश्वनाथ केळकर यांची निवड झाली आहे संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या पंचकमिटीने एकमताने ही निवड केली आहे. याबद्दल परिसरातून डॉ. केळकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. श्रीरामनवमीच्या दिवशी ही निवड करण्यात आली.
कै. गोविंद केळकर, कै. शंकर केळकर, कै. विश्वनाथ केळकर यांच्यानंतर डॉ. श्रीराम केळकर यांच्या रूपाने केळकर घराण्यातील चौथी पिढी श्रींच्या सेवेत कार्य करत आहे. २००९ पासून डॉ. केळकर हे पंच म्हणून कार्यरत होते. आता त्यांची सरपंचपदी निवड झाली आहे.
अतिशय शांत, प्रेमळ व मनमिळाऊ स्वभाव आणि अत्यंत हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या केळकर यांची निवड संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या पंचकमिटीवर झाल्याने संपूर्ण मालगुंड व गणपतीपुळे परिसरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button