मुख्य बातमीलोकसभा २०२४

निवडणूक निरीक्षकांकडून निवडणूक कामकाजाचा आढावा

रत्नागिरी : येथील अल्पबचत सभागृहात निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राहुल यादव आणि निवडणूक निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुधांशु मिश्रा यांनी निवडणूक कामकाजाबाबत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोडल अधिकारी व समन्वयक अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदुर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, परिविक्षाधीन आयएएस डॉ. जस्मिन, विशाल खत्री आदी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “सर्वांनी चांगले प्रशिक्षण घ्या. होम वोटिंगच्यावेळी गोपनीयता राखणे अत्यंत महत्त्वाचेआहे. व्हिव्हीपॅट कसे हाताळावे, याबाबतही एक व्हीडीओ सर्वांना देण्यात येईल.”

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये एकूण उमेदवार, त्यांचे आलेले अर्ज, दिव्यांग तसेच ८५ वर्षांपुढील मतदारांसाठी केलेली तयारी, प्रशिक्षण, ईव्हीएमची सरमिसळ, केंद्रस्तरीय परिवेक्षक, मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, भरारी पथक, स्थिर निगरानी पथक आदींबाबत माहितीचा समावेश होता.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांनीही सादरीकरण करून सीमा तपासणी नाके, प्रतिबंधात्मक आदेश, केलेली कार्यवाही, शस्त्रास्त्र, परवाने, स्ट्राँगरुम बंदोबस्त अशी एकूणच कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button