मुख्य बातमीराजकीयलोकसभा २०२४

खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

तिसऱ्या दिवशी २ उमेदवारांची ४ नामनिर्देशन पत्र दाखल

रत्नागिरी : ‘दररोज सभा सुरू असून, संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत १०७ खळा बैठका झाल्या आहेत. महिन्यातले किमान २० दिवस आणि दिवसातले १४ तास मतदारसंघाला देणारा खासदार म्हणून गर्व नसून बाळसाहेबांचा शिवसैनिक म्हणून लोकांपर्यंत पोचत असल्याचे समाधान आहे. भविष्यातही ५ वर्षे ‘इंडिया’ आघाडीचा खासदार म्हणून पुन्हा तुमच्यासमोर उभा राहणार,’ असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमार्फत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक भाऊराव राऊत यांनी आज (ता. १६) ढोल-ताशांच्या गजरात आणि हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंग यांच्याकडे दाखल केला. तत्पूर्वी खासदार राऊत यांनी माळनाका येथील मराठा भवन येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या वेळी ‘मविआ’चे प्रमुख नेते आणि हजारो शिवसैनिक त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. दरम्यान, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी खासदार राऊत यांच्यासह अमृत अनंत तांबडे यांनी अपक्ष १ नामनिर्देशन पत्र दाखल केले. अशी एकूण दोन उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र आज दाखल केली. आजपर्यंत एकूण तीन उमेदवारांची ५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button