“कांचन डिजिटल”तर्फे ९ एप्रिलला आकर्षक वेशभूषा स्पर्धा
हिंदू नववर्ष शोभयात्रेतून निवडणार आकर्षक "गुढीपाडवा बालतारा"

रत्नागिरी : येथील प्रसिद्ध “कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ”तर्फे “गुढीपाडवा बालतारा” ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरीत ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता भव्य स्वरूपात निघणाऱ्या हिंदू नववर्षं शोभयात्रेत हिंदू संस्कृतीशी निगडित आकर्षक वेशभूषा करणाऱ्या सहभागी बालकांमधून “गुढीपाडवा बालतारा” निवडण्यात येणार आहेत. ही आगळी संकल्पना “कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ”चे प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांनी आणली आहे.
गतवर्षीही शोभयात्रेत श्री. मालगुंडकर यांनी “गुढीपाडवा तारका” ही खास महिलांसाठी स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला होता. यंदा बालकांसाठी “गुढीपाडवा बालतारा” ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेलाही बालकांचा व त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास श्री. मालगुंडकर यांनी व्यक्त केला आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष भव्य शोभयात्रेत बालकांनी हिंदू धर्माशी निगडित धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक व्यक्तीरेखा किंवा इतर आगळी आकर्षक वेशभूषा करून सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच सहभागी स्पर्धेकांनी ग्रामदैवत भैरी मंदिर, मारुती मंदिर सर्कल ते पतीतपावन मंदिर असे संपूर्ण शोभयात्रेत सहभागी होणे अत्यावश्यक आहे. या स्पर्धेतून एकूण ५ आकर्षक “गुढीपाडवा बालतारा” काढण्यात येणार आहेत. ज्यांना शोभयात्रेच्या सांगतेला ऐतिहासिक पतितपावन मंदिरात मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. बालकांसाठी (मुलगा, मुलगी दोन्ही) १२ वर्षेपर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. तरी पालकांनी याची दखल घ्यावी आणि आपल्या पाल्याना आकर्षक वेशभूषेसह स्पर्धेत सहभागी करावे. सहभागी होण्यासाठी ८९९९३३२७५७, ९४२२५७६७३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मालगुंडकर यांनी केले आहे.



