मुख्य बातमीराजकीय

काय करायचे, काय करायचे नाही याबाबत दक्ष रहा : एम देवेंदर सिंह

सिंधुदुर्ग क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक

रत्नागिरी : काय करायचे आणि काय करायचे नाही, याबाबत सर्वांनी दक्ष रहावे, त्याचबरोबर दिलेली जबाबदारी एकमेकांच्या समन्वयाने पार पडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिल्या आहेत.
सिंधुदुर्गमधील विधानसभा मतदारसंघनिहाय क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी सिंह यांनी काल (ता. ३) राजापूर येथील आबासाहेब मराठे ऑर्टस ॲण्ड न्यू कॉमर्स, सायन्स कॉलेजमधील इनडोअर स्पोर्ट्स स्टेडियममध्ये बैठक घेतली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदुर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, सिंधुदुर्गचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आदी उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कार्य व जबाबदाऱ्या यात विशेषत: मतदान पूर्व आणि मतदानादिवशीच्या जबाबदारीचा समावेश होता. मतदान केंद्रावर योग्य निवडणूक व्यवस्थापन असल्याची सुनिश्चिती, त्याचबरोबर अश्वासित सुविधांची खात्री करणे, रॅम्प, पिण्याचे पाणी, पुरेसे फर्निचर, योग्य प्रकाश व्यवस्था, विद्युत व्यवस्था, प्रसाधनगृहे, मतदान पूर्व संध्येची जबाबदारी आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, ‘मतदारांना ‘व्होटर इन्फॉरमेशन स्लीप’ अर्थात मतदार चिठ्ठीचे वाटप बिएलओमार्फत पूर्ण करावे. याचे वाटप झाले की नाही, याबाबतही खातरजमा करावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करावी. दिलेले काम समन्वयाने चोखपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक विषयक साहित्याचे वाचन करावे.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button