मुख्य बातमी

निवडणुकीच्या कामातून दिव्यांग, शिक्षकांना सूट मिळण्यासाठी निवेदन

रत्नागिरी : दिव्यांग कर्मचारी, शिक्षक यांना लोकसभा निवडणुकीच्या कामातून सवलत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आली असून, याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मुख्य निवडणूक अधिकारी तसेच राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार दिव्यांग कर्मचारी, शिक्षक यांना निवडणूक कामासाठी सवलत देण्यात आलेली असताना रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग यांच्या स्वतंत्र नोंदी प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षक, कर्मचारी यांना जिल्हाभरात निवडणूक कामासाठी आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेतर्फे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची भेट घेवून त्यांना सर्व दिव्यांग कर्मचारी शिक्षक यांचे याबाबतचा आदेश रद्द करण्याची विनंती करण्यात आली. तसेच त्यांना निवेदन सादर करण्यात आले. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी दिले आहेत. दरम्यान, हे निवेदन सादर करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गोरे, जिल्हा सचिव आनंद त्रिपाठी, जिल्हा संघटक व्यंकटेश आटक तसेच जिल्हा कार्याध्यक्ष अशोक जायभाये यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button