हेगशेट्ये महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात ३० मार्चला फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते. यात आदित्य बिर्ला कॅपिटलचे रत्नागिरी शाखाप्रमुख योगेश शिंदे, आरोग्य विमा सल्लागार विनय गोगटे आणि सीनियर एजन्सी मॅनेजर गौरव जोशी यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे यांच्यासह महाविद्यालया सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होत्या. या प्रसंगी मार्गदर्शन करताना शाखाप्रमुख श्री. शिंदे यांनी आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण आयुष्य जगताना अनेक आजारांचा, व्याधींचा, दुर्धर रोगांचा सामना करावा लागतो. या आजारांवर उपचार घेताना बऱ्याचदा वैद्यकीय सुविधा खर्चिक असतात म्हणूनच आजच्या जीवनात आरोग्य विमा असणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. तसेच अॅक्टिव वन, नो क्लेम बोनस, प्री हॉस्पिटलायझेशन, पोस्ट हॉस्पिटलायझेशन, अॅम्ब्युलन्स कव्हर, अॅक्सिडेंट डेथ कव्हर आदींविषयी सविस्तर माहिती दिली.

आरोग्य विमा सल्लागार गोगटे यांनी प्रत्यक्ष जागेवर काम करताना आलेले अनुभव कथन केले. आरोग्य विमा हा गरजेचा असून तो प्रत्येकाकडे असायलाच हवा असे सांगितले. आज उद्भवणाऱ्या आजारपणात वय हा विषयच राहील असून कमी वय असलेल्या तरूणांमध्येही व्याधींचे, आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. सचिन गिजबिले यांनी केले. प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे यांनी आभार मानले.



