मुख्य बातमीशैक्षणिक

जे. पी. डांगे यांची मत्स्य महाविद्यालयाला भेट

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे प्रवेश नियामक प्राधिकरण अध्यक्ष व राज्याचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांनी नुकतीच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील मत्स्य विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधाकर इंदुलकर यांनी त्यांचे स्वागत केले.
श्री. डांगे यांनी यावेळी मत्स्य महाविद्यालयाच्या पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विस्तृतपणे माहिती घेतली. महाविद्यालयात होत असलेल्या पारदर्शक प्रवेश प्रक्रियेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत महाविद्यालयात देशाच्या सर्व राज्यांतील विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रम शिक्षणासाठी येतात, हे जाणून त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालय व इतर विभागांबद्दल माहिती घेतली.
यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. इंदुलकर यांनी महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक, संशोधन, विस्तार शिक्षण आणि सामाजिक वाटचालीबद्दल श्री. डांगे यांना माहिती दिली. याप्रसंगी पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम समन्वयक डॉ. दबीर पठाण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button