राजकीयलोकसभा २०२४

ठाकरे गटाची १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. छ संभाजी नगर मधून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सांगलीतून चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रायगडमधून अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली असून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून पूर्वीच कामाला लागलेल्या विनायक राऊत यांचेही नाव जाहीर करण्यात आले आहे. मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई वायव्य या मुंबईतील दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला होता; पण तिथेही अमोल किर्तीकर आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर करत या दोन जागा ठाकरे गटाने आपल्याकडे घेतल्या आहेत.
शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. १७ जागांवरच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. २२ जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादी तयार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज (ता. २७) सकाळी ९ वाजता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात काही विद्यामान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे, तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जे सत्तेसोबत गेले नाहीत, त्या निष्ठावंतांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे. ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, अरविंद सावंत,राजन विचारे, संजय जाधव या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी विद्यमान खासदार राऊत यांचे नाव जाहीर झाल्याने दोन्ही जिल्ह्यांतील शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे : 
१. बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
२. यवतमाळ – संजय देशमुख
३. मावळ – संजोग वाघेरे- पाटील
४. सांगली – चंद्रहार पाटील
५. हिंगोली – नागेश अष्टीकर
६. छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
७. धाराशीव – ओमराजे निंबाळकर
८. शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे
९. नाशिक – राजाभाऊ वाझे
१०. रायगड – अनंत गिते
११. रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत
१२. ठाणे – राजन विचारे
१३. मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील
१४. मुंबई- दक्षिण – अरविंद सावंत
१५. मुंबई – वायव्य अमोल किर्तिकर
१६. मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
१७. परभणी – संजय जाधव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button