मुख्य बातमीराजकीय

मतदान ओळखपत्र नसल्यास अन्य पर्याय उपलब्ध : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी : ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळू शकणार नाहीत, अशांसाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुद्धलेखनाच्या चुका, छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद ७ मध्ये नमूद केलेली ओळखपत्रे पर्याय असणार आहेत. यात आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफिसने फोटोसह दिलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्यविमा स्मार्ट कार्ड, ड्राईव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्ताऐवज, केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेक कं. कर्मचाऱ्यांने दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार/एमएलसी यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग आयडी कार्ड (युडीआयडी) यांचा समावेश आहे. यापैकी एक मतदान केंद्रावर सादर करणे हा मतदारांना पर्याय असला तरी, मतदारांनी मतदार ओळखपत्रे तयार करून घेण्यास प्राधान्य द्यावे. लोकप्रतिनिधी कायदा १९५०च्या कलम २० ए अंतर्गत मतदार यादीत नोंदणी केलेले परदेशी मतदार त्यांच्या भारतीय पासपोर्टमधील तपशीलांच्या आधारे ओळखले जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button