मुख्य बातमी

संगमेश्वरला गडनदी धरणपूर्ती संकल्प मेळावा २६ मार्चला

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण कृती समितीच्या वतीने २६ मार्च रोजी गडनदी धरणपूर्ती संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सायंकाळी ५ वाजता संगमेश्वर येथील सोनवडे हायस्कूल येथे होणार आहे.
या मेळाव्यात संगमेश्वर तालुक्यातील चार-पाच दशके रखडलेल्या गडनदी धरणाचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने विचार-विनिमय केला जाणार आहे. लाभार्थी शेतकरी, ग्रामस्थांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवून त्यात समन्वय साधण्याचे काम केले जाणार असून, शासकीय अधिकारी/लोकप्रतिनिधी/सर्व पक्षीय नेते यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. त्याचप्रमाणे गडनदी धरण कृती समितीच्या आजवरच्या कामाचा आढावा घेऊन पुढील दिशा या मेळाव्यात ठरविली जाणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कींजळे, देवोळे, फणसवळे, कुळे, वाशी, मुचरी, तेर्ये, सोनवडे, बोरसूत, सायले, विघ्रवली, काटवली, ओझरे खुर्द, कोंड ओझरे, तळवडे, कोसुंब, सांगवे, किडदाडी, देव धामापूर, मठ धामापूर , कुडवली, पूर, उमरे या संलग्न गावांतील ग्रामस्थांनी या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडनदी धरण कृती समितीतर्फे करण्यात आले आहे.

मेळाव्याविषयी : 
दिनांक : मंगळवार, २६ मार्च २०२४
वेळ : सायंकाळी ५ वाजता
स्थळ : सोनवडे हायस्कूल, संगमेश्वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button