मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्यांचा अभिनेता वैभव मांगलेआणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्याहस्ते होणार गौरव

रत्नागिरी  ः- मृणाल हेगशेट्ये स्मृति आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा उत्स्फूर्त वातावरणात सुरू झाली असून आज १३ रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसिध्द अभिनेता वैभव मांगले आणि अभिनेत्री वीणा जामकर, दूरदर्शनचे जेष्ठ निवेदक, माजी निर्माते  जयू भाटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

मृणाल हेगशेट्ये स्मृति राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन एस एम जोशी विद्यानिकेतन येथे मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. यावेळी संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्य डॉ संजय गवाळे, प्राचार्य उल्हास सप्रे, परीक्षक राजेश कांबळे,डॉ सोपान जाधव, नेत्रा आपटे, अनुप्रिता कोकजे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक सचिन टेकाळे यांनी प्रास्ताविक करताना मागील ४० वर्षाच्या दीर्घ परंपरेचा आढावा घेतला.

यावेळी चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पाठांतर म्हणजे वक्तृत्व नव्हे. श्रोत्याला खिळवून ठेवत त्यांना संमोहित करतो तोच खरा मोठा वक्ता असतो. आज वक्तृत्व ही अत्यावश्यक कला बनली असून आजच्या जेन जी च्या काळात मृणाल हेगशेट्ये स्मृति आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा अभिव्यक्तीचे व्यासपीठ बनले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःची वक्तृत्व शैली जोपासावी असे आवाहन त्यांनी केले.

प्राचार्य संजय गवाळे यांनी वक्तृत्व ही व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारी कला आहे असे सांगितले. जिल्हास्तरीय माध्यमिक गटाची स्पर्धा पहिल्या दिवशी पार पडली. मराठी व इंग्रजी माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या गटामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

आज शनिवार दिनांक १३ रोजी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता स्पर्धेचे बक्षीस वितरण सिने अभिनेता वैभव मांगले, अभिनेत्री वीणा जामकर, दिग्दर्शन श्रीधर मेस्त्री, जेष्ठ निवेदक, दुरदर्शनचे माजी निर्माते जयु भाटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

कुर्ला टू वेंगुर्ला या मराठी चित्रपटाच्या प्रोमोसाठी रत्नागिरीत आलेल्या टीमचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन डॉ. संजय गवाळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button