Uncategorizedपर्यटनमुख्य बातमीसाहित्य-कला

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन

सोलापूर : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चितमपल्ली (वय -९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 30 एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते आजारी होते. आज संध्याकाळी सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली.  त्यांनी एकूण 5 लाख किमी प्रवास केला. मारुती चितमपल्ली यांना 13 भाषांचे ज्ञान होते. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली.  त्या माहितीची नोंद केलेल्या आणि 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण केले

अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली आहेत. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button