मुख्य बातमीराजकीयसाहित्य-कला

देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत- सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : जागतिक संगीत दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा आज सांस्कृती कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.

२१ जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे ४.३० वाजता सोहळा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे.

मराठी भाषा आणि कलाकारांसाठी नवे व्यासपीठ

रेडिओ क्षेत्राला गौरव देणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. राज्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपण्याचे काम रेडिओ मार्फत झाले आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती आजही रेडिओ मार्फत जतन करण्यात आल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे.

ज्या रेडिओच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन, राजकारण, सामाजिक जाणीव यासाठी भरीव योगदान दिले आहे त्यांना यामध्यमातून योग्य सन्मान देण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणाऱ्या “महाराष्ट्र भूषण आशा भोसले” यांच्या नावाने देण्यात येणार आहे. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रातील एकूण योगदान लक्षात घेता हे नाव देण्याचे शासनाने निश्चित केल्याचे ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button