महुआ महोत्सवात’ श्री. देवी वाघजाई सांस्कृतिक कलामंचाने केले महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व.

मध्यप्रदेश (भोपाळ) :- मध्यप्रदेश सांस्कृतिक विभागामार्फत मध्यप्रदेश जनजातीय संग्राहालयाच्या १२ व्या स्थापना दिनानिमित्त ‘महुआ महोत्सव ‘ ६ जून ते १० जून या कालावधित पार पडला.
या महोत्सवात भारतातील विविध राज्यांना आपली लोककला सादर करण्यासाठी मध्यप्रदेश सांस्कृतिक विभागामार्फत पाचारण करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रथमच श्री.देवी वाघजाई कलामंच तेर्ये या कलामंचाला मिळाली. या कलामंचाचे प्रमुख श्री. राजेंद्र दत्ताराम बाईत आणि टीम ने महुआ महोत्सवात कोळी नृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली.कोळी बांधवांची जीवनगाथा उलघडणाऱ्या या नृत्याने आयोजकही भारावले.मध्यप्रदेश सरकारने या सहभागी कलाकारांचा यथोचित सन्मान केला.
कलेचा वारसा लाभलेले श्री.राजेंद्र बाईत यांचे वडील श्री.दत्ताराम बाईत हे देखील पहाडी आवाजाचे, लोककला शाहीर,कवी होते.त्यांच्याच तालमीत तयार झालेले देवी वाघजाई सांस्कृतिक कलामंचाचे प्रमुख श्री.राजेंद्र बाईत हे संगीत क्षेत्रातील जाणकार, उत्कृष्ठ वादक आहेत. त्यांनी अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. महाराष्ट्राची लोककला जतन आणि संवर्धनाचे कार्य ते नमन या लोककलेच्या माध्यमातून कित्यके वर्षे करत आहेत.
श्री.वाघजाई सांस्कृतिक कलामंचाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
हा कलामंच नावारूपाला येण्यासाठी श्री सतीश पवार,श्री उमेश बाईत, श्री अजित मोहिते,श्री.उदय भुरवणे, श्री सुभाष पवार या मंचाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.



