बाबू पाटील यांच्या वाटद कार्यालयाला महायुतीच्या प्रमुख नेत्यांची भेट
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद, कोतवडे जिल्हा परिषद गटातील ना. उदय सामंत यांचे कट्टर समर्थक बाबूशेठ पाटील यांच्या कार्यालयाला आज (३० एप्रिल) महायुतीचे उमेदवार नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांनी सदिच्छा भेट दिली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्रीय नारायण राणे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील वाटद, कोतवडे जिल्हा परिषद गटातील महायुतीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा वाटद येथील सर्वसाक्षी मंगल कार्यालयात आज आयोजित केला होता. सभेपूर्वी श्री. पाटील यांच्या कार्यालयाला सर्व मान्यवर नेत्यांनी सदिच्छा भेट देऊन तळागाळात पोहोचलेले लोकप्रिय स्थानिक नेतृत्व म्हणून बाबूशेठ पाटील मित्र मंडळाचा या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
वाटद, कोतवडे जिल्हा परिषद गट हा आमदार सामंत यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने या परिसरातून लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार श्री. राणे यांना मताधिक्य कसे मिळेल, याविषयीच्या रणनीतीबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी श्री. पाटील यांच्या समवेत बाबूशेठ पाटील मित्र मंडळाचे सर्वश्री प्रमोद प्रभाकर घाटगे, शरद काशिनाथ चव्हाण, अनिरूद्ध कमलाकर साळवी, अथर्व अनिरूद्ध साळवी (युवा सैनिक), पार्थ प्रसाद उर्फ बाबाशेठ पाटील, साईराज किशोर धुंदुर, विकास कमलाकर निंबाळकर, नंदुशेठ केदारी, मुश्ताक टेमकर, निसार जांभारकर, सुजित दुर्गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बाबूशेठ पाटील मित्र मंडळाच्यावतीने कॅबिनेट मंत्री श्री. चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.



