कोंडगावमध्ये शिमगोत्सवाची उत्साहात सांगता.

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव चव्हाटा देवस्थानच्या शिमगोत्सवाची सांगता उत्साहात झाली. गुढीपाडव्याच्या पहाटे या उत्सवाची परंपरेने सांगता होते. लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा आणि संकटकाळी भक्तांच्या हाकेला धावणारा अशी भक्तांची श्रद्धा असलेले जागृत देवस्थान म्हणून श्रीदेव चव्हाटा अनेकांचे श्रद्धास्थान आहे कोंडगावमध्ये पाडव्यापर्यंत शिमगोत्सवाची धामधूम असते
पाडव्याच्या आदल्या दिवशी श्रीदेव चव्हाटा देवाला रूपं लावणे सजवणे त्यानंतर नवस बोलणे तळी व त्यानंतर घोरीपाचा कार्यक्रम करून सांस्कृतिक कार्यक्रमाणे पाडवा पहाटे शिमगोउत्सवाची सांगता झाली
यावेळी शेट्ये, पोतदार,महाजन, पाटेकर कदम, चव्हाण, झगडे, किर,पाथरे, लिंगायत,मांडवकर,राऊत, शिंदे कोलते, थरवळ,शेडे,शेडगे, पोटफोडे, अठरा कुंभकरी, मानकरी, भक्तगण यांच्या उपस्थितीत शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली.



