मुख्य बातमी
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे उद्या जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार (८ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी ५.३० वाजता रत्नागिरी येथील मत्स्यव्यवसायीकांच्या समस्यांबाबत व मिरकरवाडा अतिक्रमणाबाबत बैठक. (स्थळ : शासकीय विश्रामगृह). सायंकाळी ६.३० वाजता भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळाव व सत्कार समारंभ (स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी) सायंकाळी ७.३० वाजता मोटारीने पुण्याकडे प्रयाण.



