मुख्य बातमी

अडूर – बुधल रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक पूर्णतः बंद

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली : महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान

गुहागर : गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यातील अडूर- बुधल गावी मुख्य रस्त्यावर दरड कोसळून महावितरणचे नुकसान झाले आहे. आज (२४ जुलै) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बुधल घाटी याठिकाणी मुख्य रस्त्याच्या लगत असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबावर दरड कोसळली. संपूर्ण रस्त्यावर दरड, विद्युत खांब व तारा, झाडी, माती पसरल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

बुधल गावावरून वस्तीला असणारी शालेय विद्यार्थांना घेऊन जाणारी बुधल – गुहागर एसटी या मार्गावरून घटनेच्या काही मिनिटांपूर्वी येथून मार्गस्थ झाली होती. सुदैवाने ही बस आधीच येथून सुटल्याने मोठी दुर्घटना टळली.

सतत पडत असलेल्या अति मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एक भला मोठा दगड रस्त्याच्या अगदी मधोमध येऊन थांबला आहे. यात महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button