रत्नागिरी जिल्हा वृत्तराजकीय

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवरुख येथे  रत्नसिंधू महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धा

देवरुख : कांजीवरा – देवरुख येथे भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुक्याच्या वतीने १० रोजी रत्न सिंधू महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच वेळी ५ बैलगाड्या धावणार आहेत.

स्पर्धेतील प्रथम सहा क्रमांकाना अनुक्रमे ५१ हजार रुपये, ३५ हजार रुपये, २५ हजार, १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये व प्रत्येकी मनाची ढाल अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेला सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार आहे.

यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार सुभाष बने, भाजपा जिल्ह्यध्यक्ष राजेश सावंत, बैलगाडा चालक मालक संघाचे जिल्ह्यध्यक्ष प्रदीप कदम,चिपळूण संगमेश्वर विधान सभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव, रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. 

तत्पूर्वी कोसुंब येथे हेलिकॉप्टरने श्री.राणे यांचे आगमन होणार आहे. यानंतर शहरातील मराठा भवन सभागृहात खासदार नारायण राणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा दिमाखात साजरा होणार आहे.

९ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणीची मुदत आहे. अधिक माहितीसाठी अण्णा बेर्डे ९४२२४३२६७३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी रविवारी भाजप कार्यालयात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन स्पर्धेबाबतची माहिती देण्यात आली.

याप्रसंगी भाजपा जेष्ठ नेते मुकुंद जोशी, माजी जिल्ह्य परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा उपाध्यक्ष संतोष केदारी, भाजपा तालुकाध्यक्ष रुपेश कदम, विनोद म्हस्के , प्रसाद सावंत,अभिजित सप्रे, निलेश भुरवणे, अभिजित शेट्ये, सुशांत मुळ्ये, प्रमोद शिंदे, दत्ताराम नार्वेकर, सचिन मांगले, सुधीर यशवंतराव, पंढरीनाथ मोहिरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button