Uncategorizedरत्नागिरी जिल्हा वृत्त

रत्नागिरी शहरात  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ७७,५००/-रु किंमतीचा अंमली पदार्थ ब्राऊन हॅरॉईन जप्त

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हयामध्ये अंमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने गस्त घालण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार हे दि. ०६/०४/२०२५ रोजी रत्नागिरी शहर परिसरात रामनवमी उत्सवाचे अनुषंगाने पेट्रोलींग करीता रवाना झालेले होते. दरम्याने गोपनीय बातमीच्या आधारे १५.१० वाजता जयस्तंभ येथील खाना खजाना हॉटेलच्या शेजारी आरोपी अरमान आदिल अशरफ शेख हा आपले दुचाकी वाहनावर बसुन हातात एक पिशवी घेवून संशईत हालचाली करता दिसून आला. सदर आरोपी आदिल अशरफ शेख यांचे ताब्यातुन एकुण १५ ब्राऊन हॅरॉईन अंमली पदार्थाच्या पुड्या व इतर साहित्य असे मिळूण ७७,५००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीस ताब्यात घेवून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १०३१/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आलेला असुन पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक स्थागुअशा, रत्नागिरी, सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, पोहवा / शांताराम झोरे, बाळू पालकर, दिपराज पाटील व गणेश सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी, यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button