विवेकरेषा व्यंगचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर.
खुल्या गटात - आनंद गायकवाड (संगमनेर) व लहान गटात - हृदय भंडारी (पालघर) प्रथम

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय ‘विवेकरेषा व्यंगचित्र स्पर्धा’ आयोजित केली होती.
यामध्ये खुल्या गटात – प्रथम क्रमांक – आनंद गायकवाड, (संगमनेर), व्दितीय क्रमांक तुषार दिलीप कुरणे, (बेंगलोर) तर तृतीय क्रमांक नीरज सबनीस, (धनकवडी, पुणे) यांना जाहीर झाला आहे.
लहान गटामध्ये – प्रथम क्रमांक – हृदय मनोज भंडारी,माहीम रोड (पालघर), द्वितीय क्रमांक मानसी दत्तात्रय पाटील (बेडग, ता. मिरज) तर तृतीय क्रमांक आफताब हमीद शेख (करंजे, सातारा) यांना जाहीर झाला आहे.
या स्पर्धेतून प्रदर्शनासाठी — दिपक नागलकर, धनराज गरड, नरेंद्र साबळे, प्रशांत कुडकर, सुरेश राऊत, अरविंद गाडेकर यांची व्यंगचित्रे निवडली आहेत.
सर्व गटातील स्पर्धकांना व्यंगचित्राचे विषय भुताटकीचा खोटेपणा, बुवाबाजी – एक फसवणूक, अंधश्रद्धा आणि विज्ञान, विवेकी विचार हे दिले होते. दोन्ही वयोगटाकरिता बक्षिसे ही प्रथम पारितोषिक ₹३,०००, द्वितीय ₹२,०००, तृतीय ₹१,००० अशी आहेत.
पुणे येथे दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. अंनिसच्या वतीने ‘विवेकरेषा‘ नावाचे एक भारतातील प्रतिभावंत व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे होणार आहे. या कार्यक्रमांत विजेत्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नागराज मंजुळे, अरविंद जगताप आणि व्यंगचित्रकार मंजुल यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान केले जातील.तसेच त्या प्रदर्शनामध्ये स्पर्धेतील निवडक व्यंगचित्रे लावली जातील.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून साप्ताहिक मार्मिक चे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव आणि व्यंगचित्रकार उदय मोहिते यांनी काम पाहिले.



