मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

कांजिवरा भागातील अनेक मुस्लिम युवकांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

देवरूख : येथील संभाजी नगर कांजिवरा भागातील विविध संघटनांच्या युवकांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

देवरूख येथील मराठा भवन येथे आयोजित केलेल्या महाआघाडीच्या मेळाव्यात युवासेनेचे नेते इशत्याक कापडी यांच्या पुढाकाराने साहील बोदले, इब्राहिम साटविलकर, सागर कदम, जसीम मुकादम, फैजान साटविलकर, अन्सार नाकाडे, अजीज बोदले, मलिक साटविलकर, यासीन रमदूल, साहील बोदले, शोयब मुकादम, सादिक बोदले, सय्यद गडकरी या युवकांनी ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी महाआघाडीचे उमेदवार प्रशांत यादव, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी उपसभापती छोट्या गवाणकर, तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button