मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त
रेल्वे थांब्यासाठी निसर्गरम्य संगमेश्वर-चिपळूण या ग्रुपच्या सदस्यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

संगमेश्वर : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची निसर्गरम्य संगमेश्वर-चिपळूण या ग्रुपच्या सदस्यांनी भेट घेतली. या वेळी रेल्वेगाड्यांच्या थांब्यांसह कोकण रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.
केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांची संगमेश्वर रेल्वेस्थानकांवर ३ गाड्यांच्या थांब्याच्या प्रलंबित मागणीविषयी निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या ग्रुपच्या सदस्यांनी भेट घेतली. या वेळी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि यावर आपण योग्य ती कार्यवाही करू, असे वैष्णव यांनी सांगितले.
या प्रसंगी ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, समीर सप्रे, दीपक पवार, गणपत दाभोलकर, जगदीश कदम, अशोक मुंडेकर आणि मुकुंद सनगरे उपस्थित होते.



